Skip to main content

रीमा लागू अनुक्रमणिका आरंभीचे आयुष्य अभिनयाची व्यावसायिक कारकीर्द रीमा लागू यांनी भूमिका केलेली मराठी नाटके रीमा लागू यांचे मराठी चित्रपट रीमा लागू यांच्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका निधन संदर्भ दिक्चालन यादी"Birthday celebrations make Reema Lagoo awkward"Amras (Cast and Crew)रीमा लागू यांचे निधन

इ.स. १९५८ मधील जन्ममराठी नाट्यअभिनेतेमराठी चित्रपट अभिनेत्रीहिंदी चित्रपट अभिनेत्रीइ.स. २०१७ मधील मृत्यू


२१ जूनइ.स. १९५८१८ मेइ.स. २०१७मैने प्यार कियाहम आपके हैं कौनहम साथ साथ हैंपुणेविवेक लागू१८ मेइ.स. २०१७












रीमा लागू




विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून






Jump to navigation
Jump to search


















रीमा लागू

रीमा लागू

जन्म
रीमा लागू
२१ जून, १९५८ (1958-06-21)[१]
मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यू
१८ मे इ.स. २०१७
राष्ट्रीयत्व
भारतीय
कार्यक्षेत्र
अभिनय
भाषा
मराठी
आई
मंदाकिनी भडभडे
पती
विवेक लागू
अपत्ये
मृणमयी विनय वायकूळ (कन्या)

रीमा लागू (पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे; (जन्म : गिरगांव, मुंबई, २१ जून इ.स. १९५८; - १८ मे, इ.स. २०१७) या मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री होत्या. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमाने अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले. मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं यासारख्या हिंदी चित्रपटातले तसेच तू तू मै मै या हिंदी दूरदर्शन मालिकेमधील त्यांचे काम गाजले.




अनुक्रमणिका





  • आरंभीचे आयुष्य


  • अभिनयाची व्यावसायिक कारकीर्द


  • रीमा लागू यांनी भूमिका केलेली मराठी नाटके


  • रीमा लागू यांचे मराठी चित्रपट


  • रीमा लागू यांच्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका

    • ५.१ चित्रपट



  • निधन


  • संदर्भ




आरंभीचे आयुष्य


मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. मूळची मुंबईची असलेल्या नयन हिचा मुंबई-पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास झाला.


त्यांचे प्राथमिक शिक्षण गिरगावातील चिकित्सक आणि कमळाबाई या शाळांमध्ये झाले. त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राशी नाते जोडले, मात्र नंतर त्यांच्या आईने त्यांना अभ्यासासाठी या क्षेत्रापासून दूर राहायला सांगितले आणि नयन १९७० मध्ये पुण्यात शिक्षणासाठी आली. हुजूरपागा शाळेत तिने ८वीत प्रवेश घेतला. १९७४ मध्ये ती मॅट्रिक झाली. पुणे येथील हुजूरपागा या शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच तिच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. आंतरशालेय नाट्य स्पर्धामध्ये ती मराठी आणि हिंदी नाटकांतून भूमिका करून हमखास बक्षिसे मिळवून द्यायची. शाळेत असताना तिने ‘वीज म्हणाली धरतीला’ आणि ‘काबुलीवाला’ या नाटकांतून काम केले होते. ‘काबुलीवाला’ नाटकातील तिचा अभिनय पाहून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यायचे. हरहुन्नरी नयनला शालेय नाटकामध्ये नेहमी पुरुष व्यक्तिरेखा साकाराव्या लागत असत. शाळेच्या अखेरच्या वर्षी अखरेच्या वर्षी तिने ‘नटसम्राट’ नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्या वयामध्ये तिच्यासारख्या मुलीने तात्यासाहेबांचे शब्द आपल्या अभिनयासह पेलणे हे खरेच कौतुकास्पद होते.


नयन भडभडे यांनी मुंबईमध्ये विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. ‘ती फुलराणी’द्वारे त्यांचा नाटकांमधील प्रवास सुरू झाला. त्यांनी श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातीमध्ये यादरम्यान काम केले. ही जाहिरात गाजली आणि मग त्यांनी अभिनय क्षेत्रात अधिक उत्साहाने काम करायला सुरुवात केली. या दरम्यान त्या बँकेतही नोकरी करत होत्या. मात्र बँकेतील नोकरी आणि अभिनयातील करिअर या दोन्ही गोष्टींचा तोल सांभाळणे कठीण झाल्याने त्यांनी पूर्णपणे अभिनयासाठी वेळ दिला. या दरम्यान त्यांनी रंगकर्मी आणि बँकेतील सहकारी विवेक लागू यांच्याशी लग्न केले आणि नयन भडभडेची रीमा लागू झाली. त्यांचा हा विवाह फार काळ टिकला नाही. त्यानंतर रीमा लागू यांनी दीर्घ काळ रीमा लागू हीच ओळख कायम ठेवली.



अभिनयाची व्यावसायिक कारकीर्द


रीमा लागू यांनी जाहिरातींमधून अभिनय क्षेत्राशी पहिली ओळख करून घेतली. महेश कोठारे यांच्यासोबत त्यांनी जाहिरातींमध्ये काम केले. ‘हा माझा मार्ग एकला’मध्येही त्यांनी लहानशी भूमिका केली होती. मात्र ती भूमिका फार प्रकाशात आली नाही. त्यांनी मास्टरजी या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. काही काळ रंगभूमीवरही त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. मात्र नंतर बराच काळ त्या अभिनय क्षेत्रापासून लांब होत्या. बालकलाकार म्हणून ‘दृष्टी आहे जगाची निराळी’ या चित्रपटातही त्यांनी महेश कोठारेंसोबत अभिनय केला. मात्र तो प्रदर्शित होऊ शकला नाही.
त्यानंतर लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. १९७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या.


नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांचे नाव रीमा लागू झाले.


रीमा लागू यांनी गुजराथी नाटकांतून, तसेच कन्नड आणि भोजपुरी चित्रपटांमधूनही काम केले. १९८०-९०च्या दशकामध्ये आमीर खान, सलमान खान, करीश्मा कपूर या अभिनेत्यांचा उदय होत असताना त्यांना आईच्या भूमिका मिळायल्या लागल्या आणि त्यांनी गरीब बापुडवाण्या आईला ग्लॅमरस रूप दिले. कयामत से कयामत तक, मैंने प्यार किया, साजन, वास्तव, कुछ कुछ होता है अशा चित्रपटांमधून एक नवी आई प्रेक्षकांना दिसली. मैंने प्यार किया, साजन, हम साथ साथ हैं, जुडवा, पत्थर के फूल, शादी करके फस गया यार, निश्चय, कहीं प्यार ना हो जाए यांसारख्या सिनेमांमध्ये रीमा यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली आहे.


रीमा लागू यांनी आरके बॅनरसोबत हीना या चित्रपटातही भूमिका केली. खानदान, श्रीमान श्रीमती, तू तू मै मै या मालिकांनी त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. तू तू मै मै या विनोदी मालिकेला प्रेक्षक आजही पसंत करतात.



रीमा लागू यांनी भूमिका केलेली मराठी नाटके


  • के दिल अभी भरा नही

  • घर तिघांचं हवं

  • चल आटप लवकर

  • छाप काटा

  • झाले मोकळे आकाश

  • ती फुलराणी

  • तो एक क्षण

  • पुरुष

  • बुलंद

  • सविता दामोदर परांजपे

  • विठो रखुमाय

  • शांतेचं कार्टं चालू आहे

  • सासू माझी ढासू

  • सौजन्याची ऐशी तैशी


रीमा लागू यांचे मराठी चित्रपट


  • अरे संसार संसार

  • आईशपथ

  • आपलं घर

  • कवट्या महांकाळ

  • जिवलगा

  • दृष्टी आहे जगाची निराळी’

  • धूसर

  • बिनधास्त

  • शुभ मंगल सावधान

  • सिंहासन

  • सैल

  • हा माझा मार्ग एकला


रीमा लागू यांच्या हिंदी दूरचित्रवाणी मालिका


  • खानदान

  • तू तू मैं मैं

  • दो और दो पाँच

  • नामकरण

  • श्रीमान श्रीमती


चित्रपट














































































































































































































































































































वर्षचित्रपटाचे नावभूमिकाइतर
२०१६
जाऊंद्या  ना  बाळासाहेब
आईसाहेब

२०१५कट्यार काळजात घुसली (चित्रपट)कट्यारआवाज
मै हू रजनीकांतस्वतः विडंबन
२०१३४९८ए : द वेडिंग गिफ्ट
२०११मुंबई कटिंग
२०१०मित्तल व्हर्सेस मित्तल
२००९
आमरस [२]

२००८किडनँपसोनियाची आजी
महबूबाराणीची आई
सुपरस्टारआई
२००६आई शपथदेवकी देसाई
२००५ डिव्होर्स नॉट बिटवीन हजबंड ॲन्ड वाईफन्यायाधीश
सँन्डविच (चित्रपट)
शादी करके फस गया
हम तूम और मॉम
कोई मेरे दिल मे हैमिसेस विक्रम मल्होत्रा
२००४हत्या (चित्रपट)
२००३कल हो ना होमिसेस माथूर
चुपके सेलक्ष्मी तिमघुरे
मै प्रेम की दिवानी हूं
प्राण जाए पर शान न जा
कवट्या महाकाळ
२००२हत्यार (चित्रपट)Shanta
२००१तेरा मेरा साथ रहेंजानकी गुप्ता
इंडियन (चित्रपट)मिसेस सूर्यप्रताप सिंग
सेन्सार
हम दिवाने प्यार केमिसेस चटर्जी
२०००कहीं प्यार ना हो जाएमिसेस शर्मा
जिस देश में गंगा रहता हैलक्ष्मी
दिवाने
निदानसुहासिनी नाडकर्णी
क्या कहना
१९९९दिल्लगी
वास्तव : द रिऍलिटीShanta
आरजूParvati
बिनधास्तAasawari Patwardhan
हम  साथ - साथ  हैंMamta
१९९८
झूट बोले कौवा काटे
Savitri Abhyankar
कुछ  कुछ  होता  हैAnjali's mother
Aunty No. 1Vijayalaxmi
दिवाना  हूं  पागल  नाही
मेरे  दो अनमोल  रतनSuman
प्यार तो होणा हि था
तिरछी टोपीवाले
१९९७दीवाना मस्ताना
Betaabi
येस बॉस
जुडवा
Rui Ka Bojh
Uff! Yeh Mohabbat
१९९६दिल तेरा दिवानाKumar's late wife and Ravi's late mom

माहीरAsha
प्रेम ग्रंथParvati
पापा केहते हैं
VijetaMrs. Laxmi Prasad
अपने दम परMrs. Saxena
१९९५रंगीला
१९९४हम  आपके  हैं  कौन ..!Nisha's mom
Pathreela Raasta
दिलवाले
१९९३प्यार  का  तराणा
दिल  है  बेताब
गुमराहSharda Chadha
आज कि  औरतJail Warden Shanta Patil
महाकाल
संग्राम
श्रीमान आशिकSuman Mehra
१९९२
शुभमंगल  सावधान
NishchaiyYashoda

दो  हंसो  का  जोडा

कैद में  है  बुलबुल
Guddo Choudhry
शोला  और  शबनमMrs. Sharda Thapa
जिना मरणा तेरे संग
जिवलगा
प्रेम  दिवानेSumitra Singh
सपने  साजन  के
१९९१साजनKamla Verma
हिना
फर्स्ट लव्ह लेटर
पत्थर के फूलMrs. Meera Verma
प्यार  भरा  दिलSudha Sunderlal
१९९०प्रतिबंध
आशिकी
पोलीस  पब्लिक
१९८९मैने  प्यार  कियाKaushalya Choudhary
१९८८रिपाई
कयामत  से  कयामत  तक
हमारा  खानदानDr. Julie
१९८५नसूरManjula Mohite
१९८०आक्रोशNautaki dancer
कलयुगKiran


निधन


रीमा लागू यांचे दिनांक १८ मे इ.स. २०१७ रोजी कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५९ वर्षांच्या होत्या. त्यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर उपचारांआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.
[३]



संदर्भ



  • http://www.imdb.com/name/nm0481363/

  • ^ Chaturvedi, Vinita. "Birthday celebrations make Reema Lagoo awkward". The Times of India. 18 May 2017 रोजी पाहिले. 


  • ^ Amras (Cast and Crew)


  • ^ रीमा लागू यांचे निधन










  • "https://mr.wikipedia.org/w/index.php?title=रीमा_लागू&oldid=1613030" पासून हुडकले










    दिक्चालन यादी


























    (window.RLQ=window.RLQ||[]).push(function()mw.config.set("wgPageParseReport":"limitreport":"cputime":"0.236","walltime":"0.293","ppvisitednodes":"value":6424,"limit":1000000,"ppgeneratednodes":"value":0,"limit":1500000,"postexpandincludesize":"value":7522,"limit":2097152,"templateargumentsize":"value":2036,"limit":2097152,"expansiondepth":"value":18,"limit":40,"expensivefunctioncount":"value":0,"limit":500,"unstrip-depth":"value":0,"limit":20,"unstrip-size":"value":255,"limit":5000000,"entityaccesscount":"value":0,"limit":400,"timingprofile":["100.00% 223.209 1 -total"," 83.67% 186.767 1 साचा:माहितीचौकट_अभिनेता"," 81.25% 181.347 1 साचा:Infobox"," 68.02% 151.829 2 साचा:Br_separated_entries"," 61.70% 137.718 1 साचा:Birth_date"," 28.58% 63.801 2 साचा:YearEN2DEV"," 17.04% 38.037 1 साचा:YearEN2DEV2"," 10.88% 24.293 1 साचा:MONTHNAME"," 9.69% 21.630 1 साचा:MONTHNUMBER"," 9.23% 20.596 1 साचा:संकेतस्थळ_स्रोत"],"scribunto":"limitreport-timeusage":"value":"0.019","limit":"10.000","limitreport-memusage":"value":1283298,"limit":52428800,"cachereport":"origin":"mw1332","timestamp":"20190312072323","ttl":2592000,"transientcontent":false););"@context":"https://schema.org","@type":"Article","name":"u0930u0940u092eu093e u0932u093eu0917u0942","url":"https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82","sameAs":"http://www.wikidata.org/entity/Q2341578","mainEntity":"http://www.wikidata.org/entity/Q2341578","author":"@type":"Organization","name":"Contributors to Wikimedia projects","publisher":"@type":"Organization","name":"Wikimedia Foundation, Inc.","logo":"@type":"ImageObject","url":"https://www.wikimedia.org/static/images/wmf-hor-googpub.png","datePublished":"2007-01-17T12:23:40Z","dateModified":"2018-08-02T11:19:00Z","image":"https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/c/c8/Reema_Lagoo.jpg","headline":"u092eu0930u093eu0920u0940 u091au093fu0924u094du0930u092au091f u0905u092du093fu0928u0947u0924u094du0930u0940"(window.RLQ=window.RLQ||[]).push(function()mw.config.set("wgBackendResponseTime":130,"wgHostname":"mw1326"););

    Popular posts from this blog

    Wiltshire Susbaint Daoine Ainmeil | Bailtean | Iomraidhean | Ceanglaichean a-mach | Clàr-taice na seòladaireachdThe Placenames of WiltshireComhairle Wiltshire

    غار سنگی حسین کوهکن محتویات مشخصات غار جستارهای وابسته پانویس منابع پیوند به بیرون منوی ناوبری۳۴°۵۷′۲۸″شمالی ۴۶°۲۲′۴۶″شرقی / ۳۴٫۹۵۷۸۵۷۵°شمالی ۴۶٫۳۷۹۵۰۶۵°شرقی / 34.9578575; 46.3795065مرصاد روایت می‌کند/ داستان غلبه اندوه یک مرد بر صخره ها/ خالو حسین کوهکن؛ وارث تیشه فرهادحسین کوهکن، مردی که تنها با یک پا و یک کلنگ در دل کوه خانه ساختشیرین کجاست؟! فرهادی دیگر در کوهای اوراماناتفارس گزارش می‌دهد: «هزار ماسوله» نگینی در دل کوه‌های شاهو: شهرستان پاوه که به شهر هزار ماسوله مشهور بوده، یکی از دیدنی‌ترین مناطق استان کرمانشاه است.فرهاد در اورامانات: هنوز هم با گذشت هزاران سال اگر کمی گوش‌هایمان را تیز کنیم صدای تیشه فرهاد را بشنویم که می‌خواهد همه غیرممکن‌ها را قربانی یک نگاه معشوق کند. تیشه‌ای که هزاران سال است در شکاف کوه بیستون افتاده و مردمان بی‌توجه می‌آیند و می‌روند اما کسی آن تیشه را نمی‌گیرد.کوهکنی دیگر از دیار بیستونویدئویی مستند درباره حسین کوهکنوو